'मोदीपर्व २.०': नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपत; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, जावडेकर, सावंत, आठवले यांनाही मंत्रिपद

Foto

नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज  संध्याकाळी सात वाजता सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, याविषयी उत्सुकता होती. महाराष्ट्रातून भाजपचे नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत रिपाइंचे रामदास आठवले यांना मंत्रिपदाची संधी मिळालीआहे. 

लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिंळवला आहे. भाजपने यावेळी लोकसभेच्या 542 जागांपैकी 303 जागा, तर एनडीएने 353 जागा मिळवल्या आहेत. मोदी हे गेल्या 50 वर्षांच्या कालखंडात सलग दुसर्‍यांदा बहुमताने निवडून येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी 7 वाजता मोदी यांचा शपथविधी झाला असृन, या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. 

अमित शहा, एस. जयशंकर यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश
पंतप्रधान म्हणून मोदींनी शपत घेण्यापूर्वी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार कि पक्षसंघटनेला महत्व देत ते पक्षाध्यक्ष पदावर कायम राहतील याबद्दल तर्कवितर्कांना ऊत आला होता. मात्र, या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला असून अमित शहा यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपत घेतली आहे. त्यांना अर्थमंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 
डोकलाम सह अन्य महत्वाच्या प्रकारांत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे एस. जयशंकर यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता आहे.